आईस्क्रीमची कोणतीच माहिती जेव्हा उपलब्ध नव्हती, त्या सोळाव्या शतकात मोगलांनी कुल्फी तयार करण्याची पद्धत शोधून काढली. खवा, पिस्ते आणि केशर यांचं मिश्रण गोठवून केल्या जाणाऱ्या पदार्थाचं नाव कुल्फी. कारण कुल्फी तयार करण्याच्या साच्याला कुल्फी असं नाव होतं. त्यानंतर मोगल काळात हिमालयाच्या पर्वतराजीं मधून बादल्यांमध्ये बर्फ गच्च भरून तो नद्यांमार्गे सर्वत्र नेला जात असे. साधारणपणे अठराव्या शतकात भारतीयांनी बर्फ तयार करण्याची कृती विकसित केली. अब्दुल फाझलच्या मते मीठ आणि पाणी यांच्या मिश्रणात मातीचं पाण्यानं भरलेलं भांडं ठेवून ते पाणी गार करण्याची पद्धत भारतात प्रथम अकबर राजाने वापरली आणि हीच पद्धत त्या वेळी चीनमध्ये बर्फ बनविण्यासाठी वापरायला सुरवात झाली. त्यानंतर अठराव्या शतकात फ्रान्स व इंग्लंडमध्येही बर्फ बनवणं व तो वापरून दूध, साखर आणि फळांचे रस यांचं मिश्रण गोठवणं या गोष्टी माहीत झाल्या. त्यानंतर या गोठवलेल्या पदार्थाला आइस्क्रीम हे नाव फिलिप लेन्सी नावाच्या माणसानं दिलं. तेव्हापासून आइस्क्रीमचं लोण सगळ्या जगात पसरलं आणि त्याची लोकप्रियताही वाढली. आईस्क्रीम आणि कुल्फी वगैरे वगैरे ही स्पेसिफिक जातकुळी अशी आहे की यांच्यावर ताव मारायला कुठलाही सिझन चालतो. थंडीत गारेगार आईस्क्रिम आणि कुल्फी खाण्याची मजा काही औरच आहे नाही का. कुल्फी आपण बऱ्याचदा मित्र-मैत्रिणींसोबत, आप्त-स्वकीयान्सोबत या टेरेसवर थंडीत बसून खालेली आहे. त्यातून जर ही कुल्फी घरीच बनवलेली असेल तर क्या बात है.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply