
साहित्य :- चार कप पाणी, दोन कप साखर, एक कपभर ताजा लिंबू रस, प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून पोटॅशियम मेटा बाय सल्फेट दोन ग्रॅम
कृती :- मंदाग्नीवर जाड बुडाच्या पातेल्यात साखर पाणी एकत्र करून सतत ढवळत राहा. साखर पूर्णपणे विरघळून दोन तास पाक तयार करा. पाक थंड झाल्यावर त्यात प्रिझर्व्हेटिव्ह घाला. लिंबू रस गाळून त्यात टाका आणि चांगले मिसळा. हा तयार सिरप स्वच्छ कोरड्या बाटल्यात भरून हवा तेव्हा वापरू शकता.
Leave a Reply