साहित्य : पिकलेले हापूस २ आंबे किंवा २ वाट्या आमरस, अननसाचे ७/८ स्लाइसेस, पुदिन्याची १२/१५ पाने, काळं मीठ, १ लिंबू, २ चमचे साखर, पाव चमचा जिरा पावडर, चिल्ड पाणी, बर्फाचा चुरा .
कृती:- दीड आंब्याच्या साली काढून फोडी करा. अर्धा आंबा सजावटीसाठी वगळा. अननसाच्या स्लाइसेसमधला कठीण भाग काढून टाका आणि मग मोठे तुकडे करा. एक दोन स्लाइसेस सजावटीसाठी वगळा.(हे आंब्याच्या सिझन साठी), पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून बोटानीच थोडी चुरडा. आता मिक्सर मध्ये एका आंब्याच्या फोडी, अननसाचे तुकडे, चुरडलेली पुदिन्याची पाने, पाव चमचा जिरा पावडर, एका लिंबाचा रस, अर्धा चमचा सैंधव असं सगळं घालून थोडा वेळ मिक्सी चालवा. याची संपूर्ण बारीक पेस्ट करायची नाही. एक तर आपण लिक्विडायझरमधे हे करत असल्याने तशी पेस्ट होणारही नाही. पण ही काळजी घ्यावी. कारण हे पेय स्मूदीच्या कन्सिस्टन्सीचं नाही. आता यात चिल्ड पाणी ओता. यात साधारण २ ग्लासेस पेय होणार आहे. त्या अंदाजाने पाणी घाला. पुन्हा मिक्सी काही सेकंद फिरवा. हे मिक्सीत फिरवलेलं पेय ग्लास मध्ये ओता. आता वगळलेल्या आंब्याच्या छान छोट्या छोट्या चौकोनी फोडी(क्यूब्ज) करा. व एक फोड एका ग्लासला लावण्यासाठी आडवी चीर देऊन तयार ठेवा. अननसाचेही असेच छोटे चौकोनी तुकडे करा. एका छोट्या तुकड्याला आडवी चीर देऊन ग्लासाला लावण्यासाठी तयार ठेवा. आता दोन्ही ग्लासात ओतलेल्या पेयावर आंब्याचे आणि अननसाचे तुकडे अलगत सोडा. जे छान वरच तरंगतील. आता एका ग्लासाला अननसाची आडवी चीर दिलेली फोड खोचा. दुसर्याछ ग्लासाला आंब्याची चीर दिलेली फोड खोचा.
समर कूलर तयार आहे. यात अननस, आंबा, पुदिना या सर्वांची वेगवेगळी आणि एकत्रित अशी छान चव लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply