
साहित्य :- दोन वाट्या स्वीटकॉर्न दाणे, दोन बटाटे, दोन चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, चवीनुसार लिंबूरस, मीठ, साखर.
कृती :- बटाटे व कणसाचे दाणे उकडून घ्या. उकडलेल्या कणसाच्या दाण्यात हिरवी मिरची पेस्ट, मीठ, साखर घालून सुकी भाजी परतून घ्या. चवीनुसार लिंबूरस घाला. उकडलेले बटाटे कुस्करून त्यात मीठ व कॉर्नफ्लोअर घालून मळा. बटाट्याची पारी करून त्यात मक्यांचे सारण भरा व गोल पॅटिस तयार करा. तेलात तळून घ्या व चटणीबरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply