साहित्य:- २ वाट्या मक्याच्या कोवळ्या कणसाचे (स्वीटकॉर्न) दाणे, २ मध्यम आकाराचे बटाटे, दोन चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, २ चमचे कॉर्नफ्लोअर, चवीनुसार लिंबाचा रस , मीठ व साखर आणि तांदळाची पिठी.
कृती:- प्रथम बटाटे व मक्याचा कोवळ्या कणसाचे दाणे उकडून घ्या. उकडलेल्या कणसाच्या दाण्यात आले व हिरवी मिरची पेस्ट, मीठ, साखर घालून सुकी भाजी परतून घ्या. चवीनुसार लिंबाचा रस घाला. उकडलेले बटाटे कुस्करून त्यात मीठ व कॉर्नफ्लोअर घालून मळून घेऊन गोळा करा. हातावर बटाट्याची गोल पारी करून त्यात मक्याॉचे सारण भरा व गोल कटलेटस् तयार करा. तांदळाच्या पिठीत घोळून घ्या व तेलात तळून घ्या आणि चटणीबरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply