साहित्य:- १ लिटर घट्ट दूध, अर्धा कप (८० ते ९० ग्रॅम) पिठी साखर, ८ ते १० काजू, ४ हिरवी वेलची, १० ते १२ पिस्ता.
कृती:- एका स्वच्छ भांड्यात दूध घेऊन उकळवायला ठेवा. काजू आणि पिस्त्याचे बारीक तुकडे करून घ्या. हिरव्या वेलचीचे दाणे काढून भरडसर कुटून घ्या. प्रत्येक एक-दोन मिनिटांनी दूध ढवळत राहा. दूध चांगले आटेपर्यंत अथवा भांड्यात अर्ध्यावर येईपर्यंत उकळवा. आता काजू आणि पिस्त्याचे तुकडे आटवलेल्या दूधात घाला. मध्यम आचेवर उकळत ठेवलेले हे दूध अजून घट्ट होऊ द्या. दूधात पिठी साखर आणि कुटलेली वेलची घालून चांगले ढवळा. हे सर्व मिश्रण एक ते दोन मिनिटे उकळवा. गॅसवरून दूध खाली उतरवून थंड होण्यासाठी बाजूला सारून ठेवा. जेव्हा दूध सर्वसाधारण तापमानाला येईल, तेव्हा एका हवा बंद भांड्यात हे मिश्रण घालून ‘डीप फ्रिझ’मध्ये सहा ते आठ तासासाठी ठेवा. कुल्फी सेट झाल्यावर ‘डीप फ्रिझ’मधून बाहेर काढा. चौकोनी आकाराचे तुकडे करून सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३
छायाचित्रः नेटवरुन.
Leave a Reply