
साहित्य : १ कप गोड घट्ट दही, २-३ चमचे साखर, पुदिन्याची पाने -७-८, बर्फ ३-४ क्यूब्ज, घरगुती साय २-३ चमचे, किंवा whipping cream किंवा व्हिप्ड क्रीम स्प्रे.
कृती : दही + साखर + चिरलेला पुदीना मिक्सर मध्ये घ्या. साखर विरघळेपर्यंत ब्लेंड करा.
बर्फ घालुन थोडा वेळ फिरवा. ग्लास मध्ये घ्या. त्यावर आपली मस्त घरगुती दाट साय घाला.
किंवा क्रीम घाला. एखाद्या पुदीन्याच्या पानाने मस्त गार्निश करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply