मँगो कोकोनट पिस्ता कुल्फी

साहित्य :- १ लिटर दूध कढईत आटवून घट्ट करावे (रबडीएवढे), १ चमचा वेलची पूड, ३ पिकलेले आंबे कापून घ्यावेत, पिस्ते ५ मिनिटे उकडून साल सोललेले असावेत, किमान ५ ते ६ चमचे; ओलं खोबरं, साखर १ वाटी, फ्रेश क्रीम फेटलेले १ वाटी, कॉर्नफ्लॉवर ३ चमचे.

कृती :- दूध आटवून मंद आचेवर ठेवा व एक वाटी साखर टाकून घ्या. थंड फ्रेश क्रीममध्ये १ वाटी साखर घालून फेटून घ्या, एकदम हलकं व्हायला हवं, मग फ्रीजमध्ये ठेवा. ३ ते ४ चमचे दुधामध्ये कस्टर्ड पावडर घोळून मग आटवलेल्या गरम दुधात ओता. सारखे हलवत राहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. दूध गॅसवरून काढून थंड करायला ठेवा व मधून मधून हलवत राहा. मग आंब्याचे तुकडे, खोबरं, उकडून सोलून घेतलेले पिस्ते आटवलेल्या दुधात घाला. आता फेटून घेतलेले फ्रेश क्रीमपण घाला. सगळं छान एकत्र करून घ्या व फ्रीजरमध्ये ठेवा. अर्धवट सेट व्हायला लागलं की, परत हलवून घ्या. म्हणजे बर्फाचे क्रिस्टल्स होणार नाहीत. असं दोनदा करा. मग एका मोल्डमध्ये कुल्फी सेट करा. सेट झाल्यावर स्लाइसेस कापून मस्त सर्व्ह करा. कापलेल्या खोबऱ्याऐवजी किसलेले खोबरे वापरता येईल. सीताफळ वापरूनपण अशाच पद्धतीने छान कुल्फी होते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

छायाचित्रः नेटवरुन.

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*