साहित्य –
दही २०० मिली
१ कप आंब्याचा रस
३/४ कप दूध
१२ ते १५ काड्या केसर (२ टेबलस्पून दुधात भिजवून)
६ टेबल स्पून साखर (आवडीनुसार कमी-जास्त )
चिमूटभर वेलची पूड
सजावटीसाठी बदाम-पिस्त्याचे काप
कृती –
सर्वप्रथम आंब्याचा रस मिक्सरमधून फिरवून घ्यावा. त्याच मिक्सरच्या भांड्यात दही, दूध, साखर, केशर व वेलची पूड घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यावे .ही तयार झालेली लस्सी फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवावी. सर्व्ह करतेवेळी ग्लासेसमध्ये लस्सी ओतून घ्यावी व वरून बदाम पिस्त्याचे काप घालावेत. लस्सी लगेच सर्व्ह करायची असल्यास सर्व साहित्य मिक्सरमधून ब्लेंड करत असतानाच त्यात बर्फाचे तुकडे घालावेत. अशाप्रकारे झटपट मॅंगो केशर लस्सी तयार.
Leave a Reply