साहित्य:- १ कप मोड आलेली मटकी, १ कप चुरमुरे, १ कप फरसाण, १ मोठ्या आकाराचा कांदा १ मोठ्या आकाराचा टोमाटो, १ छोटी काकडी, २ हिरव्या मिरच्या, मीठ व साखर चवीनुसार, १ छोटे लिंबू रस, १/४ कप कोथंबीर.
कृती:- कांदा, कोथंबीर, टोमाटो बारीक चिरून घ्यावे. काकडी चोचून घ्यावी किंवा बारीक चिरून घ्यावी. हिरवी मिरची वाटून घ्यावी. एका भांड्यात चिरलेले कांदा, कोथंबीर, काकडी व टोमाटो घेवून हिरवी मिरची घालावी व मोड आलेली मटकी घालावी. वरतून मीठ, फरसाण, घालून मिक्स करून मग त्यामध्ये लिंबू रस व साखर घालून हलक्या हाताने हलवून घ्यावे. मग त्यामध्ये चुरमुरे घालून मिक्स करून वरतून कांदा, कोथंबीर, टोमाटोने सजवावे व चटपटीत भेळ सर्व्ह करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply