साहित्य:
तीन कप – मटार दाणे
चार चमचे – टोमॅटो सॉस
पाव कप – वाटलेला कांदा
दोन कप – तळून घेतलेले पनीरचे चौकोनी काप
एक चमचा – गरम मसाला पावडर
दोन चिमूट – तिखट
एक चमचा – आलं लसणाची पेस्ट
चवीपुरते मीठ
कृती:
एका पातेल्यात तेल गरम करुन त्यात वाटलेला कांदा, आले-लसणाची पेस्ट घालून चांगले परता. चांगले परतून झाल्यावर त्यात टोमॅटो सॉस व तिखट घाला. जरुरीइतके पाणी घालून त्यातच गरम मसाला पावडर व मीठ घाला.
मटार शिजवून घ्या. व शिजवलेले मटार यात घाला. एक उकळी आली की तळलेल्या पनीरचे काप त्यात घाला. मंद आचेवर थोडा वेळ ठेवून पातेले खाली उतरवून ठेवा.
अशाप्रकारे लज्जतदार मटार पनीर करी तयार. गरमागरम रोटीबरोबर सर्व्ह करा.
Leave a Reply