साहित्य:- दोन वाट्या बासमती वा दिल्ली राइस, एक वाटी ते दीड वाटी मटार, पाव वाटी काजू, धने – जिरे पूड, लाल तिखट पाव चमचा हळद, तेल, मीठ, फोडणीचे साहित्य तूप, खोबरे – कोथिंबीर, कढीलिंब, एक चमचा साखर वा गूळ.
कृती:- प्रथम कढईत वा पातेल्यात तेल घालावे. दिल्ली राइस स्वच्छ धुऊन अर्धा तास निथळत ठेवावा. तेलात मोहरी – जिरे – हिंग – हळद घालावी व त्यावर तांदूळ व मटार घालून ४-५ मिनिटे घालून परतून घ्यावे. कढीपत्ता, काजू, तिखट पाव चमचा, धने जिरे पूड १-१चमचा मीठ साखर घालून तांदूळ चांगला परतावा. अंदाजे ५ वाट्या पाणी उकळवून ते तांदळावर घालावे. भात मसालेदार हवा असल्यास 1 चमचा गोडा मसाला घालावा व मंद गॅसवर ढवळून झाकण घालून भात शिजवावा. १-२ चमचे तूप वरतून सोडावे. भात वाढल्यावर वर कोथिंबीर व खोबरे घालून वाढावा. भात मऊ आवडत असल्यास आंबेमोहोर वापरावा. टोमॅटोचे सार वा कढीबरोबर हा भात छान लागतो. आवडत असल्यास जिरे व कोरडे खोबरे भाजून व मिक्सऊरमध्ये बारीक करून तेही मसाले भातात घालावे. अंदाजे एक ते दीड चमचा, त्यामुळे भाताला खमंगपणा येतो. याच पद्धतीने आपल्या आवडीची भाजी घालून मसालेभात करू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply