साहित्य – १ वाटी मैदा – मीठ, अर्धी वाटी मटार, दोन बटाटे उकडून व कुस्करून, एक ते दीड चीजची क्युचब किसून, पाव चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, तळणीसाठी तेल.
कृती – प्रथम १ वाटी मैदा, १ चमचा तेल व मीठ व पाणी घालून घट्टसर मळून घ्या. अर्धी वाटी मटार उकळत्या पाण्यात मऊ शिजवून घ्या. बाहेर काढून मॅश करून घ्या. दोन बटाटे उकडून मॅश करा. दोन्ही एकत्र करून त्यात मीठ, मिरची पेस्ट व चीज किसून घाला व मळून छान गोळा करून घ्या. भिजवलेला मैद्याच्या गोळ्यापैकी लिंबाएवढा गोळा घ्या व छोटी चौकोनी पोळी लाटा. त्यावर वरील सारण घालून रोल तयार करा. रोलच्या कडेच्या दोन्ही बाजू पाण्याचा अलगद हात लावून बंद करा. साधारण दोन ते अडीच इंचाचा एक रोल झाला पाहिजे. कढईत तेल गरम करा व हे रोल त्यात गुलाबी रंगावर खरपूस तळून घ्या. सॉसबरोबर सर्व्ह करा. वरील रोल्स तयार करून झिपलॉक बॅगमध्ये ठेवून वरच्या डी-फ्रॉस्टच्या कप्प्यात ७-८ दिवस आरामात राहतात. ऐनवेळी तेल गरम करून तळता येतात. चीजमुळे हे मटार रोल्स खूपच चवदार लागतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply