साहित्य:- ४ वाट्या मटारचे दाणे, एक वाटी ओले खोबरे, अर्धी वाटी कोथिंबीर निवडून व स्वच्छ धुऊन, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गोडा मसाला, मीठ, तेल, फोडणीचे साहित्य, लिंबाएवढा गूळ, कढीपत्ताची १० ते १२ पाने.
कृती : प्रथम चार वाट्या मटार उकळत्या पाण्यात घालून ५ ते ७ मिनिटे राहू द्यावेत. मिक्सारमध्ये ओले खोबरे, मिरच्या, कोथिंबीर घालावे मीठ, जिरे घालून व थोडे पाणी घालून वाटण करून घ्यावे. पातेल्यात तेल घालून जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून खमंग फोडणी करावी. त्यावर वाटण घालून परतावे. 2 वाट्या पाणी व मटार घालून उसळ उकळू द्यावी. मीठ, गूळ, धने, जिरे पूड, गोडा मसाला घाला व मटार नीट शिजू द्या. हवी त्याप्रमाणे दाट वा पातळ करा. ब्रेड, पोळीबरोबर लिंबू पिळून सर्व्ह करा. 1) हीच उसळ कांदा आले लसूण खोबरे यांचे वाटण घालूनही करतात. आवडत असल्यास टोमॅटोही घाला. हे वाटण, उकडलेले बटाटे, मटार व गरम मसाला घालून, आलू मटार ही पंजाबी डिश करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply