साहित्य- एक जुडी मेथीची पाने, दोन मोठे कांदे, एक चमचा आले-लसूण पेस्ट, एक वाटी दूध, एक वाटी टोमॅटो प्युरी, चार-पाच हिरव्या मिरच्या वाटून, एक वाटी मटार दाणे आधीच शिजवून ठेवलेले, एक मोठा चमचा काजू पेस्ट, एक वाटी क्रीम अथवा साय, एक चमचा धने-जिरे पूड, थोडी तिखटपूड, एक चमचा गरम मसाला, दोन चमचे तूप, चवीनुसार मीठ व थोडी साखर.
कृती – मेथीची पाने चिरून मीठ लावून ठेवावीत व दहा मिनिटांनी पिळून घ्यावीत म्हणजे कडवटपणा कमी होतो. दोन मोठे कांदे बारीक चिरून तुपावर परतून घ्यावेत. नंतर मेथी घालून परतावेत.
मेथी शिजत आली, की वाटीभर दूध घालून झाकण न लावता शिजवावे. एक चमचा आले-लसूण पेस्ट व एक वाटी टोमॅटो प्यूरी घालावी. थोडी तिखटपूड, वाटलेल्या हिरव्या मिरच्या, एक चमचा गरम मसाला, धने-जिरेपूड व नंतर शिजवलेले मटार मिसळावेत. नंतर मीठ, साखर, काजू पेस्ट व साय घालावी. ही भाजी सरसरीत असते. हा पदार्थ वेगळ्या चवीचा असून, सध्या सर्व रेस्टॉरंटमध्ये खूप लोकप्रिय आहे. गरम गरम पराठ्याबरोबर मस्त लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply