साहित्य- दोन वाट्या बासमती तांदूळ, एक जुडी मेथीची पाने धुवून बारीक चिरून, दोन तमालपत्रे, एक इंच दालचिनी, 10-12 मिरे, चार लवंगा, दोन-तीन वेलदोडे, दोन चमचे आले, लसूण व हिरवी मिरची पेस्ट, एक चमचा धने-जिरेपूड, एक वाटी मटार, चार चमचे साजूक तूप, चवीनुसार मीठ, साखर, दोन कांदे तळून व थोडे काजू.
कृती- तांदूळ धुवून अर्धा तास निथळत ठेवावेत. जाड बुडाच्या पातेल्यात चार चमचे तूप घालून त्यात तमालपत्र-दालचिनी-मिरे, लवंगा, वेलदोडे घालून परतावे. नंतर चिरलेली मेथी व मटार घालून परतावे.
त्यात आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट व धने-जिरेपूड घालावी. नंतर धुवून ठेवलेले तांदूळ घालून परतावे. अंदाजे मीठ व चवीला थोडी साखर घालावी. नंतर चार वाट्या आधण पाणी घालून पुलाव शिजवून घ्यावा. (हवे तर कुकरमध्ये शिजवून घ्यावे) पुलाव वाढताना वर तळलेला कांदा व तळलेले काजू घालावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply