
साहित्य – एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी चण्याचे वा ज्वारीचे पीठ, दोन वाट्या चिरलेली मेथी, हिरवी मिरची-आले पेस्ट एक चमचा, धने-जिरेपूड एक चमचा, चार चमचे तेलाचे मोहन, चवीनुसार मीठ व थोडी साखर.
कृती – वरील सर्व जिन्नस व तेलाचे मोहन एकत्र करून थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे.
थोडे थोडे पीठ मुठीत घेऊन मुटके बनवावेत. हे लांबट गोळे (मुटके) प्रथम कुकरमध्ये वाफवून घ्यावेत व नंतर गार झाल्यावर तेलात तळून घ्यावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply