साहित्य: ३ कप मेथीची फक्त पाने, १/२ कप मटार, १ हिरवी मिरची, १/२ कप कांद्याची पेस्ट, १ टेस्पून बटर, २ काळ्या मिरी, १ वेलची, १ लहान दालचिनीची काडी, १/२ कप दुध, चवीपुरते मिठ.
कृती: कढईत बटर गरम करावे त्यात हिरवी मिरची घालून काही सेकंद परतावे. नंतर मिरी, वेलची आणि दालचिनीची काडी घालून त्यांचा छान वास येईस्तोवर परतावे. या फोडणीत कांद्याची पेस्ट घालावी. मध्यम आचेवर परतावे. कांद्यातील सर्व पाणी निघून जाऊन कांदा शिजला कि त्यात धुवून स्वच्छ केलेली मेथीची पाने घालावीत. मध्यम आचेवर मेथी परतावी. शिजवताना कढईवर झाकण ठेवू नये, मेथीचा रंग बदलतो. पाने थोडी शिजली कि त्यात मटार आणि दूध घालावे आणि मंद आचेवर शिजवावे. चवीनुसार मिठ घालावे. १ ते २ टेस्पून क्रिम घालावे आणि थोडावेळ मंद आचेवर शिजवावे. हि भाजी छान मिळून यायला वेळ लागतो त्यामुळे शिजवताना घाई करू नये.
Leave a Reply