साहित्य – मेथीची पाने – १ वाटी, बेसन / चणा डाळीचे पीठ – २ चमचे, वाटलेली हिरवी मिरची / लाल तिखट – चवीनुसार, मीठ – चवीनुसार
तीळ – १ चमचा, हिंग – १/२ लहान चमचा, हळद – १ लहान चमचा, कणिक / गव्हाचे पीठ – १ १/२ वाटी.
कृती – मेथीची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरावीत. त्यात मीठ, हिंग, हळद, मिरची पेस्ट / तिखट कालवावे. त्यात तीळ, बेसन आणि कणिक घालून गोळा मळून घ्यावा. हे पीठ थोडेसे चिकट होते त्यामुळे तेलाचा हात लावून छोटे गोळे बनवावेत आणि कणिक अथवा तांदळाच्या पिठावर लाटावेत. तेल, तूप, लोणी किंवा वनस्पती तुपावर खरपूस भाजावेत. सोबत घट्ट दही किंचित मीठ आणि तिखट भुरभुरून वाढावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply