
साहित्य:
२०० ग्रॅम मेथीचे दाणे
३०० ग्रॅम रवा
२५० ग्रॅम साजूक तूप
३५० ग्रॅम पिठीसाखर
१/२ टीस्पून वेलची पूड
२५० मि.लि. दूध
१०० ग्रॅम सुका मेव्याचे मिश्रण
कृती:
मेथी निवडून घ्यावी. तव्यावर हलक्या आचेवर परतून ३-४ तास दूधात भिजवून ठेवावी.
थोड्या तूपात रवा परतून घ्यावा. गुलाबी रंग आला की मेथीचे दाणे वाटून ते या रव्यात घालून परतावे. जरा कोमट होऊन द्यावे. मग त्यात साखर, वेलची व सुका मेव्याचे काप घालावेत.
हे मिश्रण व्यवस्थित हलवून त्याचे लहान लहान लाडू करावेत.
Leave a Reply