साहित्य- एक जुडी मेथीची पाने धुवून चिरून, चार-पाच वाट्या ताक, अर्धी वाटी बेसन, फोडणीसाठी एक चमचा तूप, जिरे, हिंग, कढीलिंबाची सात-आठ पाने, थोडे आले किसून, १०-१२ लसूण पाकळ्या, तीन-चार लाल सुक्यार मिरच्या, मीठ, साखर चवीनुसार.
कृती- एक चमचा तुपात जिरे, हिंग व कढीलिंबाची पाने घालून फोडणी करावी. त्यात चिरलेली मेथी घालून परतावे. शिजल्यावर ताकात बेसन कालवून शिजलेल्या मेथीवर घालावे. किसलेले आले, चवीनुसार मीठ, साखर घालून छान उकळी येऊ द्यावी, फार घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालावे.
नंतर चमचाभर तुपात लसूण पाकळ्या व तीन-चार लाल सुक्या् मिरच्या परतून वरून घालावे.
रोजच्या आमटीऐवजी बदल म्हणून वाटीत ही ताकातली मेथी नक्कीच सर्वांना आवडेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply