३-४ डाळी, तांदूळ. गहू आणि निवडक मसाले यांचे मिश्रण असलेले हे चटकदार मेतकूट आजच करुन बघा…
साहित्य :
२ वाट्या चणाडाळ
१/२ वाटी उडीद डाळ
१/४ वाटी मूगडाळ
१/४ वाटी तांदूळ
१/४ वाटी गहू
१ चमचा हळद
१ चमचा लाल तिखट
१ चमचा हिंग
१ चमचा सुंठ पावडर
१ चमचा लाल मोहोरी
कृती :
सर्व डाळी, गहू, तांदूळ मध्यम आचेवर वेगवेगळे व कोरडेच भाजावे. लाल मोहोरी मूग डाळीबरोबर भाजावी.
हळद, हिंग, तिखट, सुंठ पावडर एकत्र करावी. कढई गरम करावी. गॅस बंद करावा आणि हे सर्व जिन्नस थोडे शेकवून काढावे.
भाजलेल्या डाळी, तांदूळ, गहू, मोहोरी एकत्र अगदी बारीक दळून आणावे. हळद, हिंग, तिखट, सुंठ पावडर यांचे मिश्रण दळून आणलेल्या पिठात निट मिक्स करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply