
साहित्य –
२०० ग्रॅ. मिल्क पावडर, २०० ग्रॅ. आयसिंग शुगर, २०० ग्रॅम बाजारी खोबरे कीस, सात-आठ वेलदोड्याची पूड, अर्धा चमचा रोझ इसेन्स व चंदेरी गोळ्या.
कृती –
मिल्क पावडर, आयसिंग शुगर व खोबरे कीस एकत्र करावे. त्यात वेलदोड्याची पूड व रोझ इसेन्स घालावा. त्यात डावभर दूध घालून मळावे. जरूर वाटल्यास आणखी थोडे दूध घालावे. वरील मिश्रणाचे छोटे मोदक (सुपारीएवढे) प्रसादासाठी करावे. मोदकाचे साचे विकत मिळतात त्यातून काढावे. प्रत्येक मोदकावर एकेक चंदेरी गोळी लावावी. मोती लावल्याप्रमाणे फार छान दिसते.
— संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply