
साहित्य ः पाव किलो हिरव्या लांबड्या जाड मिरच्या, दोन चमचे आले-लसूण पेस्ट, 50 ग्रॅम चिंच, एक चमचा हळद, कढीपत्ता, तीन चमचे तेल, फोडणीसाठी मोहरी, मेथी, जिरे, 100 ग्रॅम सुके खोबरे भाजून, 100 ग्रॅम तीळ भाजून, 100 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे, 50 ग्रॅम जिरे भाजून, 50 ग्रॅम धने भाजून.
कृती ः भाजलेले खोबरे, तीळ, शेंगदाणे, जिरे, धने, मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. मिरचीला एकीकडून चीर देऊन घ्यावी.
कढईत तेल गरम करून त्यात मिरच्या अर्धवट तळाव्यात.
उरलेल्या तेलात जिरे, मोहरी, मेथीची फोडणी करावी.
त्यात हळद, आले-लसूण पेस्ट व खोबऱ्याची कुटलेली चटणी घालून परतावी.
चिंच पाण्यात कोळून ते पाणी त्यात घालावे.
मिश्रणाला उकळी आली, की त्यात तळलेल्या मिरच्या घालाव्या.
सर्वांत शेवटी त्यात कढीपत्ता घालावा.
रस्सा हवा तेवढा घट्ट करावा. हा रस्सा बिर्याणीबरोबर सर्व्ह करतात.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
Leave a Reply