मिक्स डाल पराठा

साहित्य: ३ वाट्या कणीक, १/४ वाटी बारीक रवा, मीठ, १/२ तेल, ओवा.

सारणाच साहित्य: १/४ वाटी प्रत्येकी तूर, चणा, मसूर, हरभरा डाळ, १ टे.स्पून आले-लसूण-मिरची पेस्ट, तिखट मीठ, अनारदाणा/आमचूर पावडर.

कृती: कणीक, रवा, मीठ व तेल घालून भिजवून १ तास ठेवावे.
नंतर मळून एकसारखे गोळे करावे. डाळी भिजवून २-३ तासांनी रवाळ वाटाव्यात.
तेल तापवून ओव्याची फोडणी करावी. डाळीचे मिश्रण घालून परतून २ वाफा आण्याव्यात. त्यात आले-लसूण-मिरची पेस्ट, तिखट, मीठ, कोथिंबीर, ग. मसाला घालून परतावे.
आमचूर पावडर घालून उतरावे. कणकेचे व सारणाचे सारखे भाग करुन पराठा करुन लाटावे.
हे पराठे पौष्टिक व चवदार होतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*