साहित्य : दोन बटाटे (शिजवून तुकडे केलेले) , एक वाटी हिरवे सोललेले मटार (दहा मिनिटं पाण्यात शिजवलेले), १/४ वाटी मक्याचे दाणे ( दहा मिनिटं पाण्यात शिजवलेले ), १/४ वाटी किसलेले गाजर, १/४ वाटी चिरलेली हिरवी सिमला मिरची, १ /४ वाटी फ्लॉवरचे तुकडे, १/४ वाटी चिरलेला कांदा, १/४ छोटा चमचा आले लसूण पेस्ट, ५ चीज क्यूबज,
१ चमचा लाल मिरची पावडर, १ चमचा पाव भाजी मसाला, १ चमचा जीरा पावडर, चिरलेली कोथिंबीर, मीठ आणि साखर.
कृती :
१) एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्या.
२) त्यात चिरलेला कांदा आणि आलं-लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
३) नंतर त्यात सर्व भाज्या घालून कढईवर झाकण ठेवून दोन वाफा काढा.
४) आता त्यात लाल मिरची पावडर, पाव भाजी मसाला,जीरा पावडर, मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून एकत्र करून घ्या. एक मिनिट शिजवून गॅस बंद करून घ्या.
५) नंतर त्यावर चिरलेली कोथिंबीर घाला.
६) फ्रँकी करताना रोटी वर हे स्टफिंग भरून त्यावर चीज किसा. रोटी च्या दोन्ही बाजू स्टफिंग वर ठेवून बंद करा आणि गरम तव्यावर थोडे तेल घालून त्यावर फ्रँकी परतून घ्या.
Leave a Reply