
साहित्य :- दोन मोठी संत्री, एक मध्यम आकाराचा अननस, दोन मोसंबी, दोन लिंबू, जरुरीइतकी साखर व मीठ.
कृती :- संत्री, मोसंबी व अननसाचा रस काढून घ्यावा. जेवढा रस त्याच्या दीडपट साखर घ्या. साखरेच्या निमपट पाणी घालून एकतारी पाक करा. पाक निवल्यावर त्यात फळांचा रस घाला. बाटलीत भरा. जरुर असेल तेव्हा बाटलीतून दोन चमचे मिश्रण ग्लासात काढून घ्या. त्यात पाणी व दूध घाला. ढवळा. थोडे मीठ घाला. प्यायला द्या.
Leave a Reply