गणपती बाप्पा येत आहेत त्यांच्या आवडीचे मोदक करूया
ग्रुप मेंबरच्या विनंतीवरून बरेच दिवस मोदकाची उकड कशी सोप्पी करता येईल त्यावर प्रयोग करत होतो आता सर्वाना सहज करता येईल अशी उकडीची पध्दत सापडली सर्वाना आवडेल अशी आशा आहे.
१. पाव कीलो मोदकाच पिठ घेवून त्यात चवीपुरते मिठ व १ चमचा तूप घालून ते साध्या पाण्याने भाकरी सारख सॉफ्ट मळून घ्यायचे
२. कुकरची शिट्टी काढून अळुवड्या लावतो तस डब्यात हा मळलेला गोळा ठेवून कुकरमधून वाफ यायला लागल्यावर ६ ते ७ मिऩिटांनी गँस बंद करावा
३. वाफवलेला गोळा परातीत घेवून साध्या पाण्याने पुन्हा सॉफ्ट मळून घ्यायचा व त्याचे मोदक बनवावेत हवे तसे मोदक बनवता येतात लाती न फाटता
मोदक तयार झाल्यावर नेहमीप्रमाणे कुकरची शिट्टी काढून वाफवून घ्यायचे
मोदकाचे सारण
सारणासाठी मोठ्या नारळाची १ कवड ,२००ग्रँम गुळ, १ चमचा तूप, १चमचा वेलची पावडर.
Leave a Reply