एकावर एक तीन मोदक (शोभेसाठी) ठेऊन केलेली सजावट…
नेहमीप्रमाणे उकडीचा मोदक करावा. पीठ जरा जास्त घ्यावे. मोदक बंद केल्यावर वर थोडे पीठ राहायला हवे. वरच्या पिठाला हाताने निरांजनाच्या वरच्या भागाचा आकार द्यावा व त्यात तूप व वात घालून दिवा लावावा.
कृती –
नेहमी उकडीचे मोदक करतो त्याप्रमाणेच कृती आहे. उकडीचे ३ गोळे करावे. एक गोळा लहान घ्यावा. दुसरा गोळा त्याच्या दीडपट घ्यावा व तिसरा गोळा दुप्पट मोठा घ्यावा.प्रथम नेहमीप्रमाणे लहान गोळ्याची पारी करून सारण भरून मोदक तयार करावा व बाजूला ठेवावा. नंतर मधल्या मोदकासाठी पिठाचा गोळा हातात घेऊन, उभट पारी करून चुण्या पाडून त्यात बेताने सारण भरावे व बाजूला ठेवावा. नंतर मोठ्या मोदकासाठी जरा उभट आकाराची पारी करावी. मोदकाला चुण्या पाडून सारण भरावे. त्यात सारण भरताना अगदी वरपर्यंत न भरता जरा कमी भरावे.आता मोठा मोदक हातात घ्यावा. त्यात अलगद हाताने, मधला तयार केलेला मोदक ठेवावा. मोठ्या मोदकाच्या चुण्या जवळ आणाव्या व मोदक बंद केल्याप्रमाणे करावे.मधल्या मोदकात प्रथम तयार केलेला लहान मोदक ठेवावा व मधल्या मोदकाच्या चुण्या जवळ आणाव्यात व अलगद हाताने मोदक बंद करावा.असे एकावर एक तीन मोदकांचे, चार मोदक करावेत. गणपतीच्या मखराच्या चारी बाजूला मांडावे.
हे मोदक करण्यासाठी खूपच कौशली जरुरी आहे. थोड्या फार सवयीने हे मोदक करता येतील. हे मोदक पुन्हा मोदकपात्रात ठेवून वाफवू नयेत. हे फक्त शोभेसाठी आहेत.
— संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply