साहित्य :- मूळ्याच्या पानांची जुडी १ मोठी, कांदा १ मोठा बारीक चिरलेला, हिरव्या मिरच्या ३ ते ४, आलं लसूण पेस्ट १ टी स्पून, जिरे १/२ टी स्पून, मोहोरी १/२ टीस्पून, बेसन ३ ते ४ टे.स्पून, हळद १/४ टे.स्पून,गरजेनुसार तेल, चवीनुसार मीठ.
कृती- प्रथम एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे, पाणी उकळले कि त्यात बारीक चिरलेला मुळ्याचा पाला घालावा व साधारण ५ टे ७ मिनीटे मध्यम आचेवर ठेवावे. त्यानंतर तो पाला एका चाळणीत काढून घ्यावा व त्यातील सर्व पाणी निथळू द्यावे. एका कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी घालावी, कांदा,हिरव्या मिरच्या व आलं-लसणाची पेस्ट घालावी ,कांदा गुलाबीसर रंगावर झाला कि त्यात हळद घालून परतून घ्यावे व ब्लांच केलेला मुळ्याचा पाला घालावा व परतून घ्यावे. थोड्या वेळात भाजीला पाणी सुटेल ते पाणी पूर्णपणे आटून भाजी कोरडी झाल्यावर चवीनुसार मीठ घालावे व परतून घ्यावे.
आता यांत बेसन घालून नीट परतून घ्यावे ,बेसनाच्या गाठी होण्याची शक्यता असते तेव्हा काळजी घ्यावी व नीट एकजीव करून घ्यावे व हलवत रहावे नाहीतर बेसन खाली चिकटते. साधारण ८ ते १० मिनिटांत आच बंद करावी व ही भाजी तोंडलावाणी म्हणून सर्व्ह करावी .
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply