साहित्य : मटणाचा खिमा अर्धा किलो, खडा मसाला पावडर १ चमचे, मीठ चवीनुसार, तमालपत्र २३, काश्मिरी ग्रेव्ही ३ वाटय़ा
कृती : मटणाच्या खिम्याला लाकडाच्या पाटीवर एका मोठय़ा लाकडाच्याच हातोडीने ठोकून ठोकून एकजीव करावे. एवढे की, ते कणकेच्या गोळ्यासारखे व्हावे. एका भांडय़ात पाण्यामध्ये खडा मसाला पावडर, चवीनुसार मीठ, तमालपत्र घालून पाणी उकळवावे. उकळी आल्यावर मटणाचे छोटय़ा लिंबाच्या आकाराचे गोळे करून यात हलकेच सोडावेत. १०-१५ मिनिटांनी या गोळ्यांचा आकार थोडा मोठा होऊन तरंगू लागतो, म्हणजेच ते शिजले आहेत असे समजावे. असे तयार गोळे काश्मिरी ग्रेव्हीत घालून तंदुरी रोटीबरोबर खावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply