साहित्य :- अडीच वाट्या मैदा, अडीच वाट्या रवा, पाच चमचे तुपाचे मोहन, चिमूटभर मीठ, बर्फाचे गार पाणी, तळण्यासाठी तूप.
साट्यासाठी :- चार चमचे तूप चांगले फेसून त्यात तीन चमचे मैदा, तांदळाची पिठी फेटून मिश्रण हलके बनवावे.
पाकासाठी :- तीन वाट्या साखरेत पाऊण वाटी पाणी घालून पक्का पाक बनवावा.
कृती :- मैदा व मीठ चाळून घ्यावे. तूप पातळ करून मैद्याला नीट चोळून घ्यावे. त्यात चाळलेला रवा मिसळावा. बर्फाच्या गार पाण्याने पीठ भिजवून घ्यावे. तीन-चार तास पीठ झाकून ठेवावे. समप्रमाणात गोळे बनवून पोळ्या लाटाव्यात. पहिल्या पोळीला साटा लावावा. दुसरीने झाकून तिला साटा लावावा व घट्ट रोल बनवावा. त्याचे एक सेंटिमीटर जाडीचे तुकडे कापून डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवावेत. मैद्यावर चपटे, चौकोनी लाटावेत. गरम तुपात अलगद सोडून सोनेरी रंगावर तळावे. मग हे चिरोटे पाकात घालून ठेवावेत. दुसरा घाणा तयार झाल्यावर पहिले चिरोटे पाकातून बाहेर काढून ठेवावेत. आवडत असल्यास वरून काजू-पिस्त्याचा चुरा भुरभुरावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मसाला चिरोटे
साहित्य:- तीन वाट्या मैदा, पाव वाटी तुपाचे मोहन, दोन चमचा जिरेपूड, एक चमचा मिरेपूड, मीठ चवीनुसार, तूप.
साट्यासाठी:- अर्धी वाटी तूप फेसून त्यात दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालून हलके मिश्रण तयार करावे.
कृती:- मैदा व मीठ चाळून घ्यावे. त्यात जिरे व मिरेपूड मिसळावी. तुपाचे मोहन घालून मिश्रण नीट मिसळून करून पाण्याने पिठाचा गोळा मऊसर भिजवून घ्यावा. त्याचे समप्रमाणात गोळे बनवून घ्यावेत व पोळ्या बनवाव्या. पहिली पोळी लाटून त्यावर साटा पसरावा. त्यावर दुसरी पोळी ठेवून तिच्यावर साटा लावावा. दोन्ही पोळ्यांचा घट्ट रोल करावा. त्याचे दीड सेंटिमीटरचे तुकडे कापून डब्यात फ्रिजमध्ये ठेवावेत. एक तासानंतर त्याचे फुलाच्या आकारात म्हणजे कापलेला भाग वर घेऊन चिरोटे लाटावे. गरम तुपात अलगद सोडावे. तूप उडवत उडवत पाकळ्या मोकळ्या करून चिरोटे एका बाजूने सोनेरी झाले की उलटून दुसरी बाजू तळावी. वर थोडा चाट मसाला किंवा आमचूर पावडर भुरभुरावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
अननसाचे चिरोटे
साहित्य:- १ वाटी मैदा, १ वाटी बारीक रवा, तळण्यासाठी तूप, साखर, साटय़ासाठी तांदळाचे पीठ, अननसाचे तुकडे, दूध.
कृती:- रवा व मैदा परातीत घेऊन त्याला चोळून चोळून तूप लावावे. प्रत्येक कणाला तूप व्यवस्थित लागले पाहिजे. किंचित मीठ घालून रवा व मैदा घट्टसर भिजवावा व तासभर ओल्या मलमलच्या कपडय़ात गुंडाळून झाकून ठेवावा. पिठाचा गोळा बाहेर काढला की चांगला तिवावा किंवा बत्त्याने कुटावा व मुलायम करून घ्यावा. वाडग्यात मैदा किंवा तांदूळ पीठ घेऊन त्यात तूप घालून चांगले फेसाळ व साटा करून घ्यावा. पातेल्यात साखर घेऊन ती बुडेल इतके पाणी घालावे. त्या अगोदर अननसाचे बारीक तुकडे करून ठेवावे व ते पाकात घालावे. स्वादिष्ट पाक तयार होईल. पिठाची पोळी लाटून मध्ये साटेा लावून एकावर एक दोन पोळ्या ठेवाव्या व गुंडाळी करून त्याचे काप काढावेत व ते हलक्या हाताने चौकोनी लाटावे व तुपात मंद आचेवर तळावेत. चांगले पदर सुटतात. ते गरम असतानाच गार पाकात टाकावेत. दुसरे तळले की पहिले काढून डीशमध्ये ठेवावेत.
टिप्स:- रवा व मैदा दूधात भिजवावा किंवा पाण्यात, चिरोटय़ावर अगदी बारीक बारीक तुकडे वर यायला हवेत. संत्रे, टोमॅटो, डाळिंबाचा रस किंवा रोझ सिरपने लाल रंग येतो, पाकात गुलकंद टाकला तर गुलाबाचा टाकावा, पाकात लिंबूरस घालू नये.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आयुर्वेदामधील चिरोटेची कृती
गोधूमधूमसी चाल्य घृतेनाक्ताक जलेन च ।
यित्वा तु तस्याश्चृ ग्राह्यं पूगप्रमाणकम् ।।
गोलकं वेल्लयित्वा तु तस्य कुर्याच्च पोलिकाम् ।
द्वितीया च तृतीया च कृत्वा स्थाप्यास्तथोपरि ।।
एकां गृहीत्वा तस्यां तु घृतं दत्वा द्वितीयकाम् ।
तस्याश्चोतपरि संस्थाय एवं स्थाप्या तृतीयका ।।
द्वयंगुलान् खण्डकान् कृत्वा वेल्लयित्वा घृतेपचेत् ।ते घृते पाचिता नाम्ना चिरोटे इति विश्रुताः ।।
गव्हाचे अगदी बारीक पीठ घ्यावे व त्यात तूप घालून चोळावे. नंतर पाणी घालून मळून कुटून कुटून मऊ गोळा करावा. त्याची सुपारीएवढी गोळी करून कागदासारखी पातळ पोळी लाटावी. अशा एकूण तीन पोळ्या कराव्या. पहिल्या पोळीवर तूप लावून त्यावर दुसरी पोळी ठेवावी. दुसऱ्या पोळीवर तूप लावून त्यावर तिसरी पोळी ठेवावी. तिसऱ्या पोळीलाही वरून तूप लावावे. हे सर्व दुमडून पट्टी तयार करावी. या पट्टीचे दोन बोट जाडीचे तुकडे कापावेत. ते पुन्हा हलक्याू हाताने लाटावेत. पूर्वीप्रमाणे या पुऱ्या तूप लावून एकावर एक ठेवून परत हलक्याा हाताने लाटून चौकोनी आकाराचा चिरोटा करून तुपात तळून साखरेत घोळावा व खावा.
ते तु शर्करया चाद्या वृष्या बल्यास्तु शुक्रलाः ।गुरवः पित्तवातघ्ना श्चो्क्ताा पाकविशारदैः ।।
चिरोटे शुक्रधातूसाठी पोषक असतात, ताकद वाढवितात, पित्त-वातदोष शमवतात, पचायला मात्र थोडे जड असतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply