तांदळाचे पदार्थ तयार करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, की तांदळाचा भात बनविताना शक्यतो शुद्ध पाणी (फिल्टर केलेले) वापरावे. त्यामुळे भात चिकट होत नाही व चवीतही फरक पडतो.
काही पदार्थ जुन्या तांदळात चांगले होतात, तर काहींना मात्र नवीनच तांदूळ लागतो.
काही तांदळाचे पदार्थ
ब्राउन राइस
साहित्य : तांदूळ २ वाटय़ा, साखर अर्धी वाटी, स्टार फुले २-३, लवंग ५-६, व्हिनेगार १ चमचा, लिंबाचा रस १ चमचा, मीठ चवीनुसार, तेल ४ चमचे, साखर अर्धा चमचा, कोथिंबीर
कृती : फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून त्यात साखर घाला. साखर ब्राऊन झाल्यावर त्यात २-३ स्टार फुले, लवंग व पाणी घालून उकळी आणा. नंतर त्यात व्हिनेगर किंवा लिंबाचा रस, मीठ, थोडी साखर व २ वाटय़ा तांदूळ घालून भात शिजवा. वरून कोथिंबीर घालून रायत्याबरोबर सव्र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
भाताचे सीख कबाब
साहित्य : शिजवलेला भात २ वाटय़ा, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, धणे-जिरे पावडर २ चमचे, आमचूर पावडर १ चमचा, चाटमसाला २ चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, मीठ चवीनुसार, कॉर्नस्टार्च २ ते ३ चमचे, उकडलेला बटाटा १ नग, तेल २ ते ३ चमचे.
कृती : भात बटाटे व उर्वरित सगळे मसाले (चाट मसाला व कॉर्नस्टार्च सोडून) एकत्र मिसळून घ्यावे. एकजीव करताना २ चमचे तेल घालावे. हे तयार झालेले मिश्रण एका सळईला लावावे. हा थर जास्त जाड असू नये. या वेळी हाताला कॉर्नस्टार्च लावून थर द्यावा. यानंतर या तयार झालेल्या सळया मंद कोळशाच्या शेगडीवर अर्धवट भाजून घ्याव्यात. सव्र्ह करते वेळी वरून पुन्हा तेलाचे ब्रशिंग करून शेगडीवर भाजून घ्यावे. वरून चाट मसाला चटणी व कचुंबरबरोबर सव्र्ह करावे.
प्रकार दुसरा : हेच मिश्रण सूप स्टिक्सला लावून कॉर्नस्टार्चच्या साहाय्याने लांबट पसरवून घ्या. नंतर गरम तेलात तळून त्यावर चाट मसाला घालून सव्र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply