साहित्य –
पाव किलो सोललेले ओले काजूगर
२ कांदे
२ बटाटे
१ टोमॅटो
अर्धा ओला नारळ किसून
लसुण
आले
गरम मसाला पावडर
तिखट
हळद
मीठ
कोथिंबीर
तेल
कृती –
काजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत. बटाट्याची साले काढून तुकडे करावेत.
प्रथम कढईत तेल टाकून जीरे-मोहरी, कांदा, लसुण व टोमॅटो टाकून चांगले परतवून घेणे. चांगले शिजल्यावर त्यात सोललेले काजू व बटाट्याचे तुकडे टाकून त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजु द्यावेत.
नंतर भाजलेल्या कांदा – खोबर्याचे वाटप करुन ते त्यामध्ये घालावे व पुन्हा चांगले शिजवून घ्यावेत. उकळ्या आण्याव्यात.
उतरताना गरम मसाला पावडर घालावी व एक उकळी आणावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उतरावे.
Leave a Reply