
साहित्य :- अर्ध्या नारळाचा चव, एक वाटी कणीक, एक वाटी मैदा, तेल आणि तूप, चार-पाच हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडं जिरं यांचं वाटण, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ .
कृती :- नारळाचा चव नारळाचंच पाणी घालून बारीक वाटून घ्यावा . मैदा आणि कणीक एकत्र करून त्यात वाटण , मीठ , साखर घालून दहा मिनिटं घट्ट भिजवून ठेवावं . मोठया लिंबाएवढा गोळा घेऊन प्लास्टिक पेपरवर छोटे पराठे लाटावे आणि तूप सोडून नॉनस्टिक तव्यावर खमंग भजावे . साखरेऐवजी दोन पेढे बारीक करून घातल्यास छान चव येते.
Leave a Reply