कांदा पराठा

साहित्य :- एक वाटी कणीक, अर्धी वाटी मैदा, एक मोठा चमचा तुपाचं मोहन, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा साखर, दोन कांदे अगदी बारीक चिरून किंवा किसून + चवीपुरतं मीठ + चिमुटभर साखर + अर्धा चमचा तिखट हे मिश्रण कालवून .

कृती :- मीठ-साखर आणि तुपाचं मोहन घालून कणीक व मैदा भिजवून घ्यावा . त्याचे मध्यम आकाराचे बारा फुलके करावेत . आता एका फुलक्यावर कांद्याचं मिश्रण पसरावं . त्यावर दुसरा फुलका कडा दाबून चिकटवावा आणि हलक्या हातानं लाटावा व तव्यावर शेकावा . अगदी खायला घेतांना पुन्हा तेल सोडून खरपूस भाजावा . उरलेल्या फुलक्यात पाच पराठे करावे.

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*