साहित्य – अर्धी ते पाऊण वाटी तुरीची डाळ, फोडणीसाठी दोन-तीन लवंगा, दालचिनी, तमालपत्र, एखाद्-दोन लाल मिरच्या, चवीनुसार मीठ, साखर फोडणी.
साहित्य – सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, लांब उभे किसलेले खोबरे (ऐच्छिक).
कृती – डाळ सात-आठ वाट्या पाणी घालून शिजवून घ्यावी. वरचं-वरचं सर्व दाट पाणी काढून घ्यावं. त्यात मीठ, थोडीशी साखर घालावी. वरून लवंग, दालचिनी, एखाद-दोन लाल मिरच्या व तमालपत्राची फोडणी घालावी. वरून कोथिंबीर, खोबरं (ऐच्छिक) घालून सजवावे व गरम-गरम प्यावं.
गरम मसाल्याऐवजी एखादी हिरवी मिरची वा थोडे आले घालून हिंग, जिरे यांची फोडणी दिल्यावरही छान चव लागते. तमीळ रसम्चा हा गुजराती भाऊच म्हणा ना!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply