साहित्य : दीड वाटी कणीक, एक वाटी बारीक चिरलेला पालक, अर्धी वाटी टोफू, पाव वाटी कांदा, अर्धी वाटी दही, एक टी-स्पून जिरेपूड, दोन टी-स्पून पुदिना चटणी, चवीपुरते मीठ, एक टी-स्पून चाट मसाला, अर्धा टी-स्पून गरम मसाला, एक टी-स्पून तेल, तूप किंवा बटर पराठे भाजण्यासाठी.
कृती :- एका मोठ्या ताटात किंवा परातीमध्ये कणीक घ्यावी. त्यात चिरलेला पालक, कुस्करलेले टोफू, कांदा, मीठ, चाट मसाला, गरम मसाला, जिरेपूड, पुदिन्याचे मिश्रण आणि तेल असे घालून नीट मिसळावे. नंतर त्यात दही घालून कणीक मळून घ्यावी. मळलेले पीठ अर्धा तास झाकून ठेवावे. मळलेल्या कणकेचे साधारण समान गोळे करावेत व गोल लाटून तव्यावर तूप किंवा बटरवर भाजावेत. गरम पराठ्यावर लोणी घालावे आणि पुदिना चटणी, खोबऱ्याची चटणी, टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply