
साहित्य – दोन वाट्या तांदूळ, एक वाटी हरभरा डाळ, अर्धा वाटी मूग डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी पोहे, अर्धा वाटी साबुदाणा, (सर्व भाजून, दळून घ्या.) अर्धा वाटी लोणी, तिखट दोन चमचे, मीठ चवीप्रमाणे, तीळ एक चमचा, लसूण पेस्ट एक चमचा, ओवा एक चमचा, धणे व जिरे पावडर दोन चमचे, पालक पेस्ट (उकडून घेतलेले) चार चमचे. तळण्यासाठी तेल, दोन चिमूट हिरवा रंग.
कृती – वर केलेले भाजणीचे पीठ दोन वाटी घेऊन बाकी सर्व पदार्थ त्यात मिक्स करून मळून घ्या. नंतर ते पीठ चकली साचामध्ये घालून चकली काढा. नंतर गॅस मोठा करून मग बारीक गॅसवर मंद आचेवर तळा. सर्व्ह करा. खमंग, रूचकर, हिरवीगार अशी पालक लसूण बटर चकली तयार होईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply