साहित्य: दिड कप कणिक, १ कप बारीक चिरलेला पालक, १/२ कप किसलेले पनीर, १/४ कप कांदा, १/२ कप दही,
१ टिस्पून जिरेपूड, २ टिस्पून पुदीना चटणी किंवा ७ ते ८ पुदीना पाने + १/४ कप कोथिंबीर + १ लसूण पाकळी + २ लहान हिरव्या मिरच्या, सर्व बारीक चिरून किंवा बारीक वाटून, चवीपुरते मिठ, १ टिस्पून चाट मसाला, १/२ टिस्पून गरम मसाला, १ टेस्पून तेल, तूप किंवा बटर पराठे भाजण्यासाठी.
कृती: कणिक एका मोठ्या वाडग्यात घ्यावी त्यात चिरलेला पालक, किसलेले पनीर, कांदा, मिठ, चाट मसाला, गरम मसाला, जिरेपूड, पुदीन्याचे मिश्रण आणि तेल असे सर्व घालून मिक्स करावे. हे कणकेचे मिश्रण सुकेच मळावे. नंतर यात दही घालून कणिक मळून घ्यावी. दही अंदाज घेत चमचा-चमचा घालावे आणि मळावे. मला साधारण १/२ कप दही लागले होते कणिक मळायला. मळलेले पिठ १/२ तास झाकून ठेवावे. मळलेल्या कणकेचे साधारण ८ समान गोळे करावेत व गोल लाटून तव्यावर तूप किंवा बटरवर भाजावेत. गरम पराठ्यावर लोणी घालावे आणि पुदीना चटणी, टोमॅटो सॉस किंवा कोणत्याही लोणच्याबरोबर पराठा सर्व्ह करावा.
Leave a Reply