साहित्य : पालक, उडदाची डाळ,हिरवी मिरची, कांदा, जिरे, चवीनुसार मीठ.
कृती : आदल्या रात्री उडदाची डाळ पाण्यात भिजवत ठेवा.
प्रथम पालकाची जुडी छान पाण्याने धुवून, चिरुन थंड पाण्यात ठेवून द्या. (पालक थंड पाण्यात ठेवला असता त्याचा हिरवा रंग तसाच छान राहतो.) त्यानंतर एका वाडग्यामध्ये रात्रभर भिजवलेली उडदाची डाळ आणि एक – दोन हिरव्या मिरच्या थोडेसे पाणी घालून मिक्सर मध्ये फिरवून त्याची पेस्ट बनवून घ्या. व त्यामध्ये चिरलेला पालक, जिरे, बारिक चिरलेला कांदा आणि चवीनुसार मीठ घालून या मिश्रणाचे पळीने गोल गोल गोळे तेलात सोडून हे वडे छान तळून घ्या. आणि हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.
Leave a Reply