साहित्य:- पिकलेला पेरू १ नग, गूळ चवीनुसार, मेथी, हिंग, मोहरी, जिरं फोडणीकरिता, हळद, तिखट चवीनुसार, धणे-जिरे पावडर- अर्धा-अर्धा चमचा, गरम मसाला १ चमचा, मीठ चवीनुसार, तेल २ चमचे, मेथी १ चमचा.
कृती:- २ चमचे तेलात मोहरी, जिरं, मेथी, िहग घालून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून नंतर पेरूच्या फोडी घालाव्या. चवीनुसार मीठ घालून थोडं वाफवल्यावर उरलेला मसाला घालून थोडं पाणी टाकून शिजवावे. सर्वात शेवटी चवीनुसार गूळ घालून थोडा वेळ थंड करून फ्रिजमध्ये ठेवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२०१७३३
Leave a Reply