पनीर माखनवाला

साहित्य : १/२ कप पनीरचे तुकडे, १/४ कप फरसबीचे तुकडे (१/२ इंच), १/४ कप गाजर (छोटे चौकोनी तुकडे), १/४ कप बटाटा (सोलून छोटे तुकडे), १/४ कप फ्लॉवरचे तुकडे, १/२ कप कांदा (छोटे तुकडे), ३ टिस्पून मटार, १ कप टोमॅटोचे तुकडे (सोललेला), १ टिस्पून टोमॅटो पेस्ट, १/२ टिस्पून जिरे, १/२ टिस्पून लाल तिखट, १/२ टिस्पून गरम मसाला, १ तमालपत्र, दिड टिस्पून दुध, दिड टिस्पून बटर, २ टिस्पून तूप, चवीपुरते मीठ.

कृती : २ कप पाण्यात फरसबीचे तुकडे, गाजर, बटाटा, फ्लॉवरचे तुकडे आणि मटार उकळवत ठेवावे. या पाण्यात १ तमालपत्र घालावे. भाज्या निट शिजू द्याव्यात. भाज्या शिजल्या कि उरलेले पाणी ठेवून द्यावे. तमालपत्र काढून टाकावे.
२ टोमॅटो पाण्यात साल सुटेस्तोवर उकळवावे. साले काढून टोमॅटोचे बारीक तुकडे करावे.
नॉनस्टीक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जिरे घालावे व कांदा परतावा. कांदा परतला कि १/२ टिस्पून गरम मसाला घालावा. कांदा निट शिजू द्यावा.
नंतर टोमॅटोचे तुकडे घालावे. तूपाचा तवंग येईस्तोवर शिजू द्यावे.
नंतर उकळलेल्या भाज्या घालाव्यात, भाज्या उकळून उरलेले पाणी, टोमॅटोपेस्ट घालावी, मीठ आणि तिखट घालावे. ढवळावे.
गॅस मंद करून दुध, बटर, पनीर घालून हळूवार ढवळावे.४ ते ५ मिनीटे मंद आचेवरच झाकून शिजू द्यावे.
गरमा-गरम भाजी नान, रोटी किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*