साहित्य : दाणे अर्धा किलो, खजूर एक पाव, गुळ एक वाटी, सुकं खोबरं एक वाटी, खसखस दोन चमचे, तूप चमचाभर, वेलचीपूड एक चमचा
कृती : दाणे खमंग भाजून सोलून घ्यावे. खजूर बिया काढून, तुपावर परतून घ्यावा. खसखस आणि खोबरे सुके भाजून घ्यावे. दाण्याचा कुट करून घ्यावा. खसखस, खोबरे मिक्सर मधून फिरवून बारीक करून घ्यावे. खजूर हाताने मऊ करून घ्यावा. गुळ खिसून घ्यावा. सगळे साहित्य एकत्र करून वेलची पूड घालावी आणि लाडू वळावे. हे लाडू आठ दिवस टिकतात (उरले तर).
काही टिप्स
१. हे अतिशय पौष्टिक लाडू आहे. आयर्न ने भरपूर.
२. लहान मुलांना सकाळी शाळेला जातांना दुधाबरोबर एक लाडू दिला तरी पोटाला आधार होतो.
3. उपासाला बरेच लोक खसखस खात नाही, तेंव्हा फक्त खसखस न घालता करावे.
– सोनाली तेलंग
Leave a Reply