साहित्य- १ वाटी बेसन, १ वाटी ताक, १ वाटी पाणी, चवीपुरते मीठ, ३ हिरव्या मिरच्या, पाव वाटी कोथिंबीर, १ वाटी ओले खोबरे आणि अर्धी वाटी हळद, हिंग, मोहरी घातलेली फोडणी.
कृती – बेसन, ताक व पाणी एकत्र करून घ्यावे. गुठळी झाली असेल तर मोडून घ्यावी. चवीपुरते मीठ घालून गॅसवर न थांबता घोटत ठेवावी. ‘चटक चटक’ आवाज येईपर्यंत घोटल्यावर चार मोठय़ा ताटात तेल लावून ते सारे मिश्रण चारही ताटात विभागून घालावे. अलगद तेलाच्या हाताने ते सारे मिश्रण ताटांना फासावे. त्यावर मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर, ओला नारळ सर्व ताटात विभागून घालावा. त्यावर दोन मोठे चमचे फोडणी पसरून लावावी. सर्व मिश्रण ताटांवर पसरून झाल्यावर साधारण १ ते दीड इंचाच्या अंतराने त्यावर उभ्या रेघा ओढाव्यात. एक एक पट्टी अलगद गुंडाळत जावी. एका ताटातून १०-१२ गुंडाळ्या तयार होतात. एकूण चाळीस ते पन्नास गुंडाळ्या ताटात काढून घेऊन त्यावर कोथिंबीर व उरलेली फोडणी घालून द्यावी.
हा खटाटोप अत्यंत अवघड आहे. अतिशय जलदपणे करावा लागणारा, चविष्ट, देखणा पदार्थ. गुंडाळ्या न जमल्यास याच सामानाच्या वडय़ा ताटात थापाव्यात.
Leave a Reply