पोंक वड्याप्रमाणे हुरडा वाटून त्यात रगडलेला बटाटा जरुरीप्रमाणे थोडंसं बेसन (ऐच्छिक) घालून भरपूर मनुका, काजू, आलं, मिरची (लसूण, खोबरं ऐच्छिक) याचं वाटण घालून त्यात चवीनुसार मीठ, साखर घालून आपल्याकडच्या उपवासाच्या कचोरीप्रमाणे गोल वळून तळतात. कित्येकदा बटाटा, मैदा यांचं आवरण करून आत वाटलेला हुरडा, मसाला, मनुका, चवीनुसार मीठ, साखर, लिंबू एकत्र करून त्यांचं सारण बनवूनही पॅटिस करतात. अर्थात घरगुती बनवताना घरोघरी गृहिणी आपल्या सवडी-आवडीनुसार व कल्पकतेप्रमाणे त्यात थोडाफार बदल करतात. महाराष्ट्रात हुरड्याबरोबर गूळ, लसणाची चटणी वगैरे खातात. तशी ही मंडळी हुरड्याबरोबर नाना प्रकारची शेव व साखरफुटाणेही खातात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply