साहित्य : अर्धा किलो चनाडाळ, अर्धा किलो साखर, १ चमचा वेलदोडा पावडर, १ चमचा जायफळ पावडर, पाव चमचा मीठ.
पारीसाठी : दीड वाटी बारीक कणीक चाळणीने चालून घेऊन, अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी मैदा, चवीला मीठ, तांदूळ पिठी.
कृती : चनाडाळ धुऊन मऊ शिजवून घ्यावी. त्यात साखर मिसळून निर्लेप/ जाड बुडाच्या भांड्यात शिजवावी. हे मिश्रण मिक्सूर अथवा पुरणयंत्रातून बारीक वाटून घ्यावे, त्यात वेलदोडा व जायफळ पावडर घालून मिश्रण जरा गार झाल्यावर मिसळून नीट कालवून घ्यावे. पिठाच्या चाळणीने चाललेल्या कणकेत, मैदा, मीठ व तेल घालून कणीक भिजवावी. आता परातीत तेल व पाणी याचे मिश्रण घेऊन ही कणीक चांगली मळून घ्यावी. कणीक खाली ओढली तर न तुटता तार आली की पुरणपोळीसाठी ती योग्य असते. या कणकेचा लहान लिंबाएवढा गोळा करून त्याला वाटीचा आकार देऊन त्यात मावेल इतके पुरण भरून वाटी बंद करून गोळा बनवावा. तांदळाच्या पिठीवर वरील गोळा ठेवूनच हलकेच पोळी पातळ लाटावी. पोळी एका बाजूने तांबूस ठिपके दिसले की पलटून दुसरी बाजू भाजावी. आवडत असल्यास वरून तूप लावून खमंग भाजावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply