साहित्य:- रवा अर्धा किलो, खवा पाव किलो, साखर ३०० ग्रॅम, जायफळ, वेलची, केशर, बदाम, काजू, किसमिस, तूप, दूध.
कृती:- प्रथम रव्यामधे तीन चमचे तूप घालून चोळून ठेवावे. अर्धे केशर बारीक करून दुधात भिजवून ठेवावे. हे दूध रव्यामधे घालून त्याचे मुटकुळे तयार करा व हे मुटकुळे तुपावर बदामी रंगात भाजून घ्यावे. तळलेले मुटकुळे पाट्या-वरवंट्यावर वाटून घ्यावे. मग त्यात बारीक साखर, खवा, थोडे तूप, केशर, वेलची, जायफळ, सुका मेवा इत्यादी घालून लाडू वळावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply