
साहित्य:- अर्धा किलो रताळी, साखर एक वाटी, ओला नारळ चव दीड वाटी, चार/पाच वेलदोडे,तूप.
कृती:- रताळ्याच्या साली काढा. त्याचे पातळसर गोल काप करा नंतर काप धुवा. बाजूला ठेवा. मंदाग्नीवर जाड बुडाच्या पातेल्यात थोडे तूप गरम करा. त्यात रताळे काप घाला. झाकण ठेवून शिजत ठेवा.झाकणावर थोडे पाणी ओतून ठेवा म्हणजे आत रताळी मऊसर शिजतात. रताळी शिजली की त्यावर नारळ चव,साखर आणि वेलची पूड टाका. थोडा वेळ मंदाग्नीवर शिजवा. थोड्या वेळाने भांडे उतरवून ठेवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply