साहित्य:- रताळी शिजवून साले काढून वाटलेला गोळा एक वाटी, गूळ किंवा साखर एक वाटी, कणीक एक वाटी, एक चमचा वेलची पूड-जायफळ पूड, तांदळाची पिठी, दोन-तीन चमचे तेल, मीठ.
कृती:- रताळी शिजवून सोलून वाटून घ्यावीत. एक वाटी रताळ्याचा गोळा, एक वाटी साखर किंवा गूळ हे एकत्र करून चांगले शिजवून घ्यावे. नंतर त्यात वेलची व जायफळ पूड मिसळावी. हे सारण तयार झाले. चाळलेल्या बारीक कणकेमध्ये मीठ व तेलाचे मोहन घालावे व पीठ मळावे. पीठ सैल असावे. पुरणाच्या पोळीप्रमाणे रताळ्याचे पुरण भरून पोळी करावी. या पोळ्या आकाराने लहान कराव्यात. नंतर नॉनस्टिक तव्यावर शेकाव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply